आशाताई बच्छाव
सुजाता कन्या विद्यालय अड्याळ येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहत संपन्न
( उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ठाणेदार धनंजय पाटील यांचे विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन)
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) – पवनी तालुक्यातील अड्याळ येथील सुजाता कन्या विद्यालय येथे विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उदघाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ( 3 जानेवारी ) ला अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलीत आणि माल्यार्पण करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. भारती गिरडकर ह्या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भाऊराव हुमणे,माजी मुख्याध्यापक टिकाराम भोयर,जिल्हा परिषद सदस्या पूजा हजारे,पंचायत समिती सदस्या स्मिता गिरी,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरी मुंडले,सहाय्यक शिक्षिका कु.एल.एम.शेंडे,महिला पोलीस हवालदार हर्षा मांढरे, शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या पुजा मानापुरे, तिर्री ग्राम पंचायतचे सरपंच सुरेंद्र आयतुलवार,अड्याळ ग्राम पंचायतचे उपसरपंच शंकर मानापुरे,उमरी ग्राम पंचायतचे उपसरपंच राष्ट्रपाल भोयर,उमरी ग्राम पंचायतचे सदस्य शोभिवंत गेडेकर,अड्याळ बिटचे वनरक्षक निलेश श्रीरामे,पत्रकार जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी उत्कृष्ठ असे स्वागत गीत नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.ह्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त शालेय आवश्यक उपक्रमासाठी करावा.मोबाईलचा वापर कमी प्रमाणात केल्यामुळे इतर घडणाऱ्या अनावश्यक घटनांवर आळा घालता येईल असे मोलाचे मार्गदर्शन स्नेहसंमेलनाच्या उदघाटन समारंभाप्रसंगी अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी केले.त्यानंतर विद्यार्थिनींशी संवाद साधतांना ह्या विद्यालयातील विद्यार्थिनी भविष्यात नक्कीच मोठे यश संपादन करून स्वतःचे आणि विद्यालयाचे नाव उज्वल करतील असा आशावाद व्यक्त केला.
कार्यक्रमाप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी कत्थक,पंजाबी,महाराष्ट्रीयन लावणी,गोंडी नृत्य,भिम गीत,गुजराती नृत्य,आदिवासी नृत्य ,विविधतेत एकता दर्शविणारे नृत्य आदी प्रकारचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ह्याप्रसंगी कार्यक्रमाला इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थिनी त्याचप्रमाणे पालक वर्ग यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दि. 4 जानेवारी 2025 ,रोजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भारती गिरडकर यांच्या अध्यक्षतेखली घेण्यात आलेल्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक टिकाराम भोयर,उमरी ग्राम पंचायतचे सदस्य शोभिवंत गेडेकर,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा माधुरी मुंडले, उपाध्यक्षा माधुरीताई मोटघरे,पत्रकार जयेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.शालेय उपक्रमांतर्गत वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध उपक्रमात त्याचप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाकेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भारती गिरडकर यांनी केले.सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका यु.बी.धुरंधर यांनी केले.तर आभार सहाय्यक शिक्षक आर.एस.नागपूरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकारिता विद्यालयातील आर.एस.नागपुरे,एन. एम.गायधने ,के.एम.पचारे.कु.युबी.धुरंधर,कु.एल. एम.शेंडे,प्रतिभा पोटवार, कु.प्रतिमा चाचेरे,,व्ही.पी.जांभुळकर,कु.एस.आर.वाहाने त्याचप्रमाणे विद्यालयातील विद्यार्थिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.