आशाताई बच्छाव
संतोष भुतेकर यांना युवा पत्रकार पुरस्कार प्रदान
जालना ( प्रतिनिधी दिलीप बोंडे) : दैनिक जगमित्रचे संपादक संतोष भुतेकर यांना प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने सोमवारी युवा पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्ह्याच्या वतीने दर्पण दिनानिमित्त सोमवारी भारती लॉन्स येथे उद्योजक शिवरतन मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी आ. अर्जुनराव खोतकर, आ.संतोष पाटील दानवे ,आ.बबनराव लोणीकर ,आ.नारायण कुचे ,माजी आ. कैलास गोरंट्याल, भास्करराव पाटील दानवे, अंकुशराव देशमुख, लक्ष्मणराव राऊत, पंडितराव भुतेकर, बद्रीनाथ पठाडे , सिद्धिविनायक मुळे, शालिग्राम मस्के, ज्ञानेश्वर शेजूळ, विजयकुमार सकलेचा, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे राज्य सरचिटणीस महेश जोशी, जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, डॉ. प्रभु गोरे, प्रा. विजय कमळे पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. युवा पत्रकार पुरस्कार मिळाल्याने संतोष भुतेकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.






