आशाताई बच्छाव
आर्थिक गैर्यवहाराची चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाची शिक्षण समितीची शिक्षण अधिकारी वसमत कार्यालयाकडे मागणी .
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –जिल्ह्यातील पी एम सी अंतर्गत शाळेतील आर्थिक गैर्यवहार झाल्याचे शिक्षण विभागाला शिक्षण समितीतीचे पत्र देण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पी एम श्री अंतर्गत एकूण पाच शाळेचा समावेश करण्यात आला आहे त्यापैकी वसमत तालुक्यातील सातेफळ अंभोरे येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेचा समावेश असून त्या शाळेतील पी एम सी अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची दूर अवस्था झाल्याचे व उर्वरित कामे न करताच शाळेतील मुख्याध्यापक यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे शालेय शिक्षण समिती सातेफळ यांनी स्पष्ट केले आहे त्यानुसार सदरील शाळेतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याचे शालेय शिक्षण समिती व सातेफळ ग्रामस्थ यांनी एका निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वसमत यांना एका लेखी निवेदनाद्वारे कळवले आहे . सदरील चौकशी 15 जानेवारीपर्यंत न झाल्यास अमोरण उपोषण करणार असल्याचे कळवले आहे .






