Home भंडारा भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या तुमसर वनपरिक्षेत्रात मृत वाघिणीच्या शरीराचे 4 तुकडे...

भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या तुमसर वनपरिक्षेत्रात मृत वाघिणीच्या शरीराचे 4 तुकडे करून जंगलात फेकले

569

आशाताई बच्छाव

1001128319.jpg

भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या तुमसर वनपरिक्षेत्रात

मृत वाघिणीच्या शरीराचे 4 तुकडे करून जंगलात फेकले

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) दिनांक 06/01/2025 रोजी भंडारा वन विभाग अंतर्गत येणाऱ्या तुमसर वनक्षेत्रातील सहवनक्षेत्र तुमसर
नियतक्षेत्र झांजरिय कक्ष क्रमांक 74 B RF मध्ये तीन पुलीया तलावाच्या बांधास लागून वन्यप्राणी वाघ मृत अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती प्राप्त होताच वनधिकारी वनकर्मचारी पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार (SOP) कार्यवाही करण्यात आली. पशुधन विकास अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण(NTCA)चे प्रतिनिधी श्री.अनिल दसहरे व प्रधान मुख्य वन संरक्षक( वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपुर यांचे प्रतिनिधी म्हणून भंडारा जिल्हा चे मानद वन्यजीव रक्षक श्री. पंकज देशमुख व SEAT स्वयंसेवी संस्थेचे श्री. शाहीद खान उपस्थीत होते.

पशुधन विकास अधिकारी नाकाडोंगरी डॉ.बारापात्रे व पशुधन विकास अधिकारी हरदोली डॉ. शुभम थोरात, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. कल्पना गायकवाड , पशुधन विकस अधिकारी, सिहोरा डॉ. आशिष गटकळ, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पशुवैध्यकिय अधिकारी डॉ. मेघराज तुलावी यांचा समावेश असलेली समिती गठित करण्यात आली व त्यांच्या चमुने मृत वाघ याचे शवविच्छेदन केले. सदर वन्य प्राण्याचा मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.मृत वाघिणीच्या शरीराचे चार भाग कापून जे घटनास्थळी फेकण्यात आले होते .

वन्यप्राणी वाघ हा मादी जातीचा वयस्कर साधारण अंदाजे 3 वर्ष वय असल्याचे आढळून आले. सदर वन्य प्राणी वाघाचे सर्व अवयव साबूत असून शव विच्छेदनाची संपूर्ण कार्यवाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण च्या प्रमाणभूत कार्यप्रणालीनुसार (SOP ) करण्यात आली व तदनंतर त्याचे शव दहन करण्यात आले.

मृत वन्य प्राण्याचे अवयवांचे नमुने घेण्यात आले असून ते उत्तरीय तपासणी करिता प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.

प्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपासाची कार्यवाही उपवनसंरक्षक, भंडारा श्री.राहुल गवई यांचे मार्गदर्शनात, प्रकाष्ट निष्काशन अधिकारी श्री.रितेश भोंगाडे व वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर श्री. रहांगडाले हे करीत आहेत

उपवनसंरक्षक भंडारा