आशाताई बच्छाव
ब्रेकिंग ? – ना. धनंजय मुंडेंविरोधात बदनामीकारक भाषण; मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल ! – धमक्या आणि शिवीगाळ प्रकरणः सिंदखेडराजा पोलीस स्टेशनमध्ये केस !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- सिंदखेडराजा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथील मोर्चादरम्यान दिलेल्या भडकाऊ भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना उद्देशून आक्षेपार्ह भाषा वापरली व “मुंढ्या पुढाऱ्याचं नाव सुद्धा घेतलं नाही” असे म्हणत “ह****** औलादी” अशी अश्लाघ्य शिवीगाळ केली.
याशिवाय, “त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, घरात घुसून मारा,” अशा स्वरूपाच्या धमक्या देऊन दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सामाजिक वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फिर्यादी भगवान पालवे रा. सिंदखेडराजा यांच्या तक्रारीवरून सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील व अंजली दामनिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कलम 356(2), 352, 351(2), 351(3) पोलिसांनी चौकशीचे काम हाती घेतले आहे. राजकीय हेतूने केलेल्या या भडक वक्तव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू आहे.