Home भंडारा तालुका विजेत्या मुलांना शाळेत गौरव चिन्ह बहाल

तालुका विजेत्या मुलांना शाळेत गौरव चिन्ह बहाल

101

आशाताई बच्छाव

1001127764.jpg

तालुका विजेत्या मुलांना शाळेत गौरव चिन्ह बहाल

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)
साकोली तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक सोहळ्यात समुहगान स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथ. शाळा क्र. १ साकोलीने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यातील सहभागी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी गौरव चिन्ह देऊन कौतुक केले.
तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा नुकताच किन्ही एकोडी येथे समारोप झाला. सांस्कृतिक कार्यक्रमात समुहगान स्पर्धेत साकोली येथील जि. प. केंद्र उच्च प्राथ. गणेश वार्ड शाळा क्र. १ ने “शिव छत्रपतींच्या शुर मर्दांनो” या गीतांचे सादरीकरण केले. यात विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला. ( सोम. ०६ जाने. ला ) शाळेचे केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, मुख्याध्यापक डि. डि. वलथरे, पद. शि. चेतन बोरकर, एम व्ही बोकडे, टी आय पटले, शालिनी राऊत, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औटी, आरती कापगते, भुमेश्वरी गुप्ता तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हेमंत भारद्वाज, उपाध्यक्ष हिमा राऊत, सदस्यगण पूनम मेश्राम, वैशाली कापगते, आशिष चेडगे, शिशुपाल क-हाडे, रिता शहारे, दिपाली राऊत, भागवत लांजेवार, दिलीप झोडे, पोषण आहाराचे रेषमा कोवे, छन्नू मडावी, कविता बावणे यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह बहाल करण्यात आले.

Previous articleप्रख्यात “दुर्गाबाई डोह” यात्रेत “बिमा सखी” भरती योजनेचे शिबिर होणार – पुजा कुरंजेकर
Next articleसभापती राम शिंदे आणि मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आनंदतीर्थ वर‌ रंगला मातृ पुजनाचा अनोखा सोहऴा…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.