Home भंडारा प्रख्यात “दुर्गाबाई डोह” यात्रेत “बिमा सखी” भरती योजनेचे शिबिर होणार – पुजा...

प्रख्यात “दुर्गाबाई डोह” यात्रेत “बिमा सखी” भरती योजनेचे शिबिर होणार – पुजा कुरंजेकर

130

आशाताई बच्छाव

1001127747.jpg

प्रख्यात “दुर्गाबाई डोह” यात्रेत “बिमा सखी” भरती योजनेचे शिबिर होणार – पुजा कुरंजेकर

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )मकरसंक्रांत निमित्त विदर्भासह महाराष्ट्रात प्रसिद्ध साकोली जवळील कुंभली दुर्गाबाई डोह यात्रा याठिकाणी तीन दिवस यात्रा दरम्यान राहते. या यात्रेत १३ ते १५ जानेवारीला “प्रधानमंत्री बीमा सखी योजना” बाबद सुशिक्षित महिलांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात महिलांना या केंद्र सरकारच्या योजनांची पूरेपूर माहिती देण्यात येणार असल्याचे साकोली शाखा मुख्य सल्लागार पुजा नरेश कुरंजेकर यांनी सांगितले.
साकोली परीसरातील ३० ते ४० कि.मी. गावातील सर्व भाविक या ठिकाणी यात्रा निमित्ताने येत असतात. ही यात्रा साकोलीच नव्हे तर विदर्भातील प्रसिद्ध सर्वात मोठी यात्रा भरते. सदर गजबजणा-या यात्रेत महिलांच्या अधिकारासाठी झटणारी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या साकोली शाखेतील बिमा सखी अभिकर्ता भरती अधिकारी पुजा नरेश कुरंजेकर हे दुर्गाबाई डोह यात्रेत “बिमा सखी” भरती शिबीर १३ जाने. ते १५ जानेवारी हे तीन दिवस आयोजन केले आहे. बिमा सखी अभिकर्ता भरती शिबीर लावण्याचा मुख्य उद्देश हा की, प्रधानमंत्री बिमा सखी योजनेबद्दल सुशिक्षित महिलांना जागृत करणे व भारतीय आयुर्विमा क्षेत्रात रोजगाराच्या माध्यमातून बिमा सखी बनविण्याचा आहे. सुशिक्षीत महिलांनी या बिमा सखी भरती कॅम्प द्वारे याची माहिती जाणून घेण्यासाठी कुंभली दुर्गाबाई डोह येथे लागणाऱ्या तीन दिवसीय बिमा सखी भरती शिबीरास भेट द्यावी असे आवाहन पुजा नरेश कुरंजेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी “प्रधानमंत्री बिमा सखी” भरती अधिकारी साकोली शाखा 9405671509 व 7720280270 यावर संपर्क साधावा असे कळविले आहे.

Previous articleभंडारा येथे वृद्ध कलावंताचे संगीतमय धरणे आंदोलन 10 जानेवारी ला
Next articleतालुका विजेत्या मुलांना शाळेत गौरव चिन्ह बहाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.