Home भंडारा भंडारा येथे वृद्ध कलावंताचे संगीतमय धरणे आंदोलन 10 जानेवारी ला

भंडारा येथे वृद्ध कलावंताचे संगीतमय धरणे आंदोलन 10 जानेवारी ला

134
0

आशाताई बच्छाव

1001127703.jpg

भंडारा येथे वृद्ध कलावंताचे संगीतमय धरणे आंदोलन 10 जानेवारी ला

प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे आवाहन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) वृद्ध कलावंत निवडीच्या प्रक्रिया संदर्भात भंडारा येथील त्रिमूर्ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रबोधनकार कला व साहित्य संघटनेच्या वतीने एक दिवसीय संगीतमय धरणे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते परमानंद मेश्राम, संघटनेचे केंद्रीय संयोजक मनोज कोटांगले ,भंडारा जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले करणार आहेत. यात सन 2021 22, 2022- 23, 2023-24 मधील ऑफलाइन अर्ज तपासून वृद्ध कलावंताची निवड करण्यात यावी, मार्च 2024 पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारावे, वृद्ध कलावंतांचे अर्ज दाखल करणारे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात यावे, या मागण्यांच्या समावेश आहे .करिता जिल्ह्यातील सर्व वृद्ध कलावंत यांनी पेन्शन साठी अर्ज केलेला आहे त्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्रबोधनकार कला साहित्य संघटनेचे जिल्ह्यातील व तहसील मधील सर्व पदाधिकारी यांनी केलेले आहे.

Previous articleआपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे बसलिंगअप्पा वंटगिरे पत्रकार पुरस्काराने सन्मानित
Next articleप्रख्यात “दुर्गाबाई डोह” यात्रेत “बिमा सखी” भरती योजनेचे शिबिर होणार – पुजा कुरंजेकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here