Home जालना दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

119

आशाताई बच्छाव

1001115585.jpg

दर्पण दिनानिमित्त पीसीएमच्यावतीने पत्रकारांचा सन्मान व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन
पत्रकार संरक्षण कायदा व ऑनलाईन पत्रकारिता या विषयावर मार्गदशन; पीसीएम जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची माहिती

जालना ।  दिलीप बोंडे ब्युरो चीफ- दर्पणदिनानिमित्त येत्या सोमवार (दि 6) रोजी जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम) जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी दिली आहे. हा सन्मान सोहळा भोकरदन नाका, राजुर रोडवरील भारती लॉन्स येथे सकाळी 11 वा. होणार आहे.
पीसीएमच्यावतीने दर्पण दिनानिमित्त दरवर्षी पत्रकारांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात येते यंदाही जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारास पीसीएम जिल्हारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच बरोबर सहा ज्येष्ठ व चार युवा पत्रकारांसह पत्रकारिता करत असतांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकार-समाजसेवकांचाही गौरव या सोहळ्यात करण्यात येणार असल्याची माहिती दीपक शेळके यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांमध्ये जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार अर्जुनराव खोतकर, परतुर विधानसभा मतदार संघाचे बबनराव लोणीकर, भोकरदन मतदार संघाचे संतोष पा. दानवे, बदनापूर मतदार संघाचे नारायण कुचे, घनसावंगी मतदार संघाचे हिकमत उढाण यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील पत्रकार संरक्षण कायदा स्वरुप व आव्हाने विशेष अभ्यास या विषयात पीएचडी करत असलेले प्रा. विजय कमळे हे पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

Previous articleनिरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति
Next articleयुवा मराठा न्यूज”चे ब्युरो चीफ गोपाल तिवारी यांना बंधूशोक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.