आशाताई बच्छाव
निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति
आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य-सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यात सहभागी करून आध्यात्मिक जागृती आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य आहे.फफ असे प्रेरणादायक प्रतिपादन निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षाच्या शुभ प्रसंगी दिल्लीतील ग्राउंड नम्बर 8, निरंकारी चौक, बुराड़ी रोड येथे आयोजित विशेष सत्संग समारोहात केले. या सत्संगात दिल्ली, एन.सी.आर. सह विभिन्न प्रदेशातून हजारो भक्तगण सहभागी झाले होते. नव वर्षाच्या प्रथम दिनी सतगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात त्यांच्या दिव्य दर्शनाचा आणि अमृतवाणीचा लाभ घेत आध्यात्मिक ऊर्जेचा सुखद आनंद प्राप्त केला.
सतगुरु माताजींनी अपने सम्बोधनामध्ये सांगितले की नववर्ष हे केवळ 2024 चे 2025 असे आकड्यातील परिवर्तन आहे. वास्तविक पाहता मानवी बुद्धीने तयार केलेली धारणाआहे. निरंकार प्रभूने काळ आणि सृष्टिची रचना केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गृहांवर वेळेचे गणित वेगवेगळे असते. म्हणूनच प्रत्येक क्षण सार्थकी लावणे हाच नववर्षाचा अर्थ आहे.
खराखुरा शाश्आवतआनंद केवळ निरंकार ईश्वरात सामावला आहे. हे नववर्ष आपण असे घडवायचे आहे ज्यायोगे प्रत्येक मानवा पर्यंत आपण हे सत्य पोहचवू शकू. जीवनात सेवा, सुमिरण आणि सत्संगचा वास्तविक अर्थ तेव्हाच प्रकट होईल जेव्हा आपण त्याचा हृदयापासून स्वीकार करु. केवळ मित्रता अथवा सामाजिक दबावाखाली आपण आपली आध्यात्मिकता बदलू नये. शुद्ध बभावना आणि जागरूक राहूनच आपण आपले जीवन निरंकार प्रभूशी जोडू शकतो.
आपल्या कर्त्यव्यांचे पालन करत प्रत्येक कार्यात निराकाराला अंतर्भूत करणे गरजेचे आहे. जीवनात आध्यात्मिकता आणि समाधान देणारा हाच मार्ग आहे. या






