Home जालना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन

106

आशाताई बच्छाव

1001115542.jpg

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या आशीर्वादाने ४ ते १९ जानेवारी दरम्यान जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज स्व-स्वरूप संप्रदाय यांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यातीलच एक सामजिक उपक्रम महारक्तदान शिबिर हे संपूर्ण भारतातमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे.जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीने जालना जिल्ह्या मधील आठही तालुक्यांमध्ये विविध ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेली आहे.दिनांक 5 जानेवारी रोजी काशीविश्वेश्वर महादेव मंदिर शिवाजी नगर जालना या ठिकाणी, ६ जानेवारी रोजी अंबड तालुक्यातील जामखेड या ठिकाणीदिनांक ९ जानेवारी या रोजी जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक या ठिकाणीदिनांक १० जानेवारी रोजी मंठा तालुक्यातील तळणी या ठिकाणीदिनांक ११ जानेवारी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद या ठिकाणीदिनांक १२ जानेवारी घनसांवगी तालुक्यातील तीर्थपुरी या ठिकाणीदिनांक १३ जानेवारी बदनापूर तालुक्यातील दाभाडी या ठिकाणी दिनांक १५ जानेवारी परतुर तालुक्यातील परतुर या ठिकाणी दिनांक १६ जानेवारी जाफराबाद तालुक्यातील माहोरा या ठिकाणी दिनांक 18 जानेवारी भोकरदन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव या ठिकाणी हे सर्व रक्तदान कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे तरी,स्व स्वरूप संप्रदाय जालना जिल्हा सेवा समितीच्या वतीने सर्व भक्त,शिष्य,साधक व मित्रपरिवार या सर्वांना या रक्तदानामध्ये सहभाग नोंदवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Previous articleपिकांची फेरपालट करा-किड रोगांचे नायनाट करा.. उर्मिला चिखले प्रकल्प संचालक आत्मा, भंडारा
Next articleशिवाजीराव आर्दड यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.