आशाताई बच्छाव
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून
भदंत संघरत्न मानके यांचा 63 व लोकसंघ तेंदबा यांचा 71 वा वाढदिवस उत्साहात साजरा
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आज 3 जानेवारी 2025 रोजी आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम अभिवादन करून पय्या मेत्ता संघाचे सिंदपुरी रुयाळ येथील अध्यक्ष भदंत संघरत्न मानके यांच्या 63 व्या त्याचप्रमाणे लोकसंग तेंदबा तिबेटी कॅम्प गोठणगाव यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त केक कापून सिंदपुरी रुयाळ या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या व बौद्ध उपासक उपासिका यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ ,शाल व चिवरदान करून सत्कार करण्यात आला . यावेळी भदंत मेतानंद, भदंत धम्मशिखर ,धम्मतप, भिक्षू देवानंद, श्रामनेर आनंद, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते धनंजय तिरपुडे, अरुण गोंडाने, डॉ प्रवीण थुलकर, माजी न्यायाधीश महेंद्र गोस्वामी, सामाजिक कार्यकर्ते रूपचंद रामटेके ,कैलास गेडाम, लहेंद्र गेडाम, अरविंद धारगावे , पत्रकार संजीव भांबोरे, धम्मानंद मेश्राम ,मनोज बनसोड, युगांतर बारसागडे व मोठ्या बौद्ध उपासक उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते अरुण गोंडाने यांनी केले. त्याचप्रमाणे डॉ. प्रवीण थुलकर यांच्या 2025 नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे लोकार्पण भदंत संघरत्न मानके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सर्व मान्यवर ,बौद्ध उपासक उपासिका यांनी जेवणाच्या आस्वाद घेतला.