आशाताई बच्छाव
जनता हायस्कूल जालना येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 03/01/2025
जालना येथील जनता हायस्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे केली तसेच यावेळी प्रभाकर सावंत यांनी सावित्रीबाई फुले यांनी महिलांवरील अन्यायकारक परंपरा मोडीत काढून महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले असे यावेळी सांगितले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात श्रीमती अनिता पवार यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. सदरील कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थिनींना बालिका दिनानिमित्त पेन्सिल व रबर देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी पवन जोशी, संतोष गंडाळ ,बाबासाहेब पवार, विष्णू पवार ,सुधीर वाघमारे ,संदीप तोडावत यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते






