आशाताई बच्छाव
म्हसरूळ येथे ग्रामपंचायत तसेच जी .प. प्रशाला म्हसरूळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – श्री मुरलीधर डहाके
दिनांक 04/01/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की मसरूळ तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी बंगाळे मॅडम तसेच जिल्हा परिषद प्रशालेचे ठेंग सर व त्यांचा शिक्षक वृंद व तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्णा लहाने यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालून प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सर्व गावकरी मंडळींनी कार्यक्रमास हजर होते. यावेळेस अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष हे आपल्या भाषणामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अहोरात्र मेहनत घेऊन महिला शिक्षण महिला चळवळीसाठी आपले जीवन या चळवळीमध्ये अर्पण केले सतीची चाल ही सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी संपुष्टात आणली अनेक चळवळींमध्ये त्या दोघांचा सहभाग होता सर्व तरुण मंडळ तरुणींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा आदर्श घ्यावा पुढेही असे ते आपल्या भाषणात कृष्णा लहाने यांनी बोलतांना सांगितले.






