Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयात ” राष्ट्रीय गणित दिवस” साजरा…

सोनई महाविद्यालयात ” राष्ट्रीय गणित दिवस” साजरा…

93

आशाताई बच्छाव

1001114187.jpg

सोनई महाविद्यालयात ” राष्ट्रीय गणित दिवस” साजरा…
अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनई या महाविद्यालयातील गणित विभागाने “राष्ट्रीय गणित दिवस” दि. १ जानेवारी २०२५ रोजी स.१०:३० वा. कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा. वाय. बी. रोकडे, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, शेवगाव यांनी रोजच्या जीवनातील वेगवेगळी गणिती उदाहरणे देवून कौशल्य कशा पद्धतीने वाढवावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. त्यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये ‘गणित रोजच्या व्यवहारात कसे फायदेशीर असते’ याचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब खेडकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. बी. के. सुद्रिक मॅडम यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पी. एस. काकडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर पोस्टर प्रेझेंटेशन(भित्त्तीचित्र) स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये आठ टीम्स ने सहभाग नोंदवला होता. त्यापैकी कु.धनायत श्रुती, कु.गायत्री शिंदे या ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. आणि शेवटी ट्रेजर हंट हा गेम मुलांसाठी आयोजित केला होता त्यामध्ये 12 टीम्स ने सहभाग नोंदवला. त्यापैकी एक टीम कु. पाटोळे गौरी, कु. नागडे साक्षी, कु.गाढे कल्याणी ही टीम विजयी ठरली. विजेत्या विद्यार्थ्यांना उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने सर आणि सन्माननीय अतिथी प्रा. वाय. बी. रोकडे सर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. अशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये “राष्ट्रीय गणित दिन” साजरा करण्यात आला.

Previous articleस्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
Next articleनेवाशातील कत्तलखान्यावर छापा, साडेतेरा लाखांचा मुद्देमाल ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.