Home नांदेड लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वयक समितीचे अध्यक्ष बालाजी पसरगे यांचे सर्वानुमते निवड

लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वयक समितीचे अध्यक्ष बालाजी पसरगे यांचे सर्वानुमते निवड

90
0

आशाताई बच्छाव

1001108760.jpg

लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वयक समितीचे अध्यक्ष बालाजी पसरगे यांचे सर्वानुमते निवड

मुखेड युवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे

मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथे होत असलेल्या लेंडी धरणा संदर्भात गेल्या ४० वर्षापासून लेंडी धरणग्रस्तावर मोठे अन्याय होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लेंडी धरणग्रस्त एकता संघर्ष समन्वय समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये मुक्रमाबाद शासकीय विश्राम ग्रहामध्ये या समितीची गठित करण्यात आली. ११ गावातील सर्व नागरिकांच्या वतीने मुक्रमाबाद येथील ग्रामपंचायत सदस्य बालाजी आप्पा पसरगे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.तर उपाध्यक्ष म्हणून बालाजी पाटील बनबरे तथा शिवराम हसणाळे रावणगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून दिनेश आवडके, नीलकंठ पाटील हिंगोलीकर,सचिव म्हणून राजुप्पा देवणे, शिवा पाटील भासवडेकर, सहसचिव व्यकटराव पाटील टिपणे,प्रदीप पाटील इंगोले, कोषाध्यक्ष कमलाकर अगदे,अनिल पाटील, दिलीप नुकुलवाड, आनंदराव गोजेगावे, तसेच प्रवक्ता म्हणून जलील पठाण, बालाजी क्यादरकुंटे यांची निवड करण्यात आली.तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून नंदकुमार खंकरे,विनोद आपटे, संजय राचलवार, बसवराज वटगिरे तर सदस्य म्हणून कपिल पाटील बनबरे,सय्यद जलालोद्दीन, सुधाकर मारंपल्ले, तुकाराम शिंदे, मशरूम पटेल, बाबुराव धोंडीबा, शेळके हनुमंत, सचिन पाटील खंडागळे, प्रवीण क्यादरकुंटे,हरिभाऊ फिरंगळवाड, संग्राम सुधाळे, संजय रकटे, विश्वनाथ माळशेट्टे बाबूअप्पा भंगे, श्रीधर देशमुख, राहुल इंदुरे, विजय वाघमारे तर मार्गदर्शक म्हणून गणपतराव क्यादररकुंटे,अविनाशराव देशपांडे हसनाळकर, विठ्ठलराव पाटील कोहिनूरकर, व्यंकटराव देशमु, व्हीएस पाटील कुनुरकर, अशोकराव देशमुख, अशोक सावकार वट्टमवार, विश्वनाथ खळुरे,यांची नियुक्ती करण्यात आली. या समवेत या समितीचे समन्वयक म्हणून हेमंत खंकरे यांची नियुक्ती करण्यात आली.

Previous articleकेजमधील लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Next articleनव्या वर्षाला युवकांचा नवा संकल्प सेंदूरवाफा साकोलीत “युवाशक्ती संघटना” स्थापित ; झाले फलकाचे अनावरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here