
आशाताई बच्छाव
केजमधील लाचखोर मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/केज दि.०१ जानेवारी २०२५ जिल्ह्यातील केज शहरात आपल्या सहकारी शिक्षकाकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांसाठी लाच मागणारा मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडला असून याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षभरात बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २९ सापळे रचून ५८ आरोपींना गजाआड केले. रात्रीची वर्षातील शेवटची कारवाई मिळवून ३० कारवाया वर्षात पूर्ण केले आहेत. तक्रारदार हे शिक्षक आहेत, ते वैद्यकीय रजेवर होते. रजेवरून हजर होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी त्यांच्याकडे त्यांनी अर्ज केला. त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक सुर्वे यांच्याकडे अर्ज देण्यास सांगितला. तक्रारदार शिक्षक मुख्याध्यापक सुर्वे यांना भेटले असता त्यांनी सदर अर्जावरून कर्तव्यावर हजर करून घेण्यासाठी व गटशिक्षणाधिकारी यांची सही घेण्यासाठी दोन हजार रुपयाची मागणी तक्रारदार यांना लाज रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाजलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक सुर्वे यांनी तक्रारदार यांना पंचायत समक्ष गटशिक्षणाधिकारी यांच्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लोकसेवक सुर्वे यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक मुकुंद आघाव, बीड उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक किरण बगाटे, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, भारत गरदे, अविनाश गवळी, खरसाडे, पुरी यांनी केली.