आशाताई बच्छाव
वाढदिवसाचा खर्च टाळून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप इंदुरे यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक
मुखेड यूवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज वंटगिरे मुक्रमाबाद
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी भाजपचे युवा कार्यकर्ते राहुल इंदूरे व त्यांचे छोटे बंधु पार्वती अर्थ मुव्हर्सचे मालक विनोद इंदूरे यांच्या वाढदिवसा निमित्त आज के. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालय मुक्रमाबाद येथील गरजु विध्यार्थ्यांना 300 परीक्षा पॅड व वहीचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अतिरिक्त खर्चटाळत इंदुरे परिवारातील भाजपचे युवा नेते राहुल इंदुरे तथा विनोद इंदुरे यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. दरवर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवले जातात. वाढदिवसाचा अतिरिक्त खर्च टाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप म्हणजे एक चांगले उपक्रम मानावे लागेल.यावेळी ग्राम पंचायत सदस्य बालाजीआप्पा पसरगे, मा. हेमंतअप्पा खंकरे, जलालोदीन सय्यद,अतुल सुनेवाड,. शाळेतील शिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते.