
आशाताई बच्छाव
श्री सोमजाई मंदिराचे ओमळी येथे भूमीपूजन
चिपळूण, विजय पवार युवा मराठा न्यूज नेटवर्क
चिपळूण तालुक्यातील ओमळीची ग्रामदेवता श्री सोमजाई देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प सोडण्यात आला असून गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी भूमीपूजनाचा कार्यक्रम दीपक गुरव व सौ. दिपाली गुरव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय कदम, सेक्रेटरी अविनाश पवार, मंदार सावंत, रमाकांत खेडेकर व जागा मालक दीपक गोखले, नरदखेरकीचे मानकरी चंद्रकांत जाधव, श्री. दळवी, पांडुरंग बांद्रे, विजय झगडे यांच्यासह सर्व मानकरी, जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी व सर्व वाडी प्रतिनिधी, ग्रामस्थांनी श्रीफळ वाढवून कुदळ मारले. श्री. नाखरेकाका व सुधीर जंगम यांनी पौरोहित्य केले. आर्किटेक्ट विजय उर्फ नाना म्हस्के यांना मंदिराबाबत सर्व माहिती देण्यात आली.
जीर्णोद्धार समिती अध्यक्ष राजू कदम, सचिव विश्वास पवार, संतोष कदम, नितीन सोमण यांनी मनोगत व्यक्त केले व मंदिर उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. तर सुभाष कदम यांनी आभार मानले. मंदिरासाठी निधी संकलन व इतर विषयावर सर्व ग्रामस्थांनी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.