आशाताई बच्छाव
साकोली आगार येथे भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजबाराव देशमुख यांची जयंती साजरी
संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)साकोली येथील एसटी बस आगार येथे भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.
सुरुवातीला डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करून माल्यार्पण आगार व्यवस्थापक सचिन आगारकर साहेब यांनी केले.
सोबतच प्रमुख उपस्थिती मध्ये प्रबोधनकार भावेश कोटांगले, कुणाल ईखार वाहतूक निरीक्षक, भूषण आगरकर लेखाकार, मनोज खंडारे वरीष्ठ लिपिक, अनिकेत हटवार, पांडुरंग हटवार,शरद दडमल, विष्णू देशमुख उपस्थित होते.