आशाताई बच्छाव
पत्रकारावरील गैरवर्तन सहन केले जाणार नाही, किनगाव राजा येथील उपनिरीक्षक यांच्यावर कारवाईसाठी डिजिटल मीडिया चिखली सचिव माळेकर यांनी दिले निवेदन….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-चिखली किनगाव राजा येथील उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डिजिटल मीडिया चिखली तालुका सचिव एकनाथ माळेकर
यांनी एका मेलद्वारे अंढेरा पोलीस स्टेशन यांना केली आहे विलास झोरे हे किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पत्रकारितेचे काम करतात त्यांनी किनगाव राजा येथे चोराचे प्रमाण वाढले ही बातमी प्रकाशित केल्यामुळे उपनिरीक्षक यांनी याचे मनात खुन्नस ठेवून विलास झोरे यांना गैरवर्तन करून आपमाणत केले आहे हा आपमान एका पत्रकाराचा नसून न्यायव्यवस्थेच्या चौथ्या आधार स्तंभाचा आहे हा अपमान कोणत्याही प्रकारे सहन केल्या जाणार नाही पोलीस कर्मचारी आणि पत्रकार या एकच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे पत्रकार आणि पोलीस कर्मचारी यांची वारंवार संबंध येतात आणि भविष्यात सुद्धा असे गैर वर्तणूक पोलीस कर्मचारी यांच्या कडून होऊ नये म्हणून सदर उपनिरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा मेल चिखली तालुका डिजिटल मीडिया तालुका सचिव एकनाथ माळेकर यांनी अंढेरा पोलीस स्टेशन मध्ये केला आहे