आशाताई बच्छाव
ब्रेकिंग ! अल्पवयीन गर्भवतीने सखी वन स्टॉपच्या महिला सुरक्षा रक्षकाच्या हातावर दिली तूरी ! – 35 वर्षीय युवकासोबत दुचाकीवरून झाली ‘सैराट!’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-बुलडाणा येथील सखी वन स्टॉपच्या एका महिला सुरक्षा रक्षकाने एका अल्पवयीन 5 महिन्याची गर्भवतीला शासकीय रुग्णालयात उपचार करून परत आणत असताना, रुग्णालयाच्या गेट जवळूनच हाताला झटका देत सदर अल्पवयीन गर्भवती एका अज्ञाताच्या दुचाकीवर बसून फरार झाल्याची घटना समोर आली आहे.
पोलीस तक्रारीनुसार, हकीकत अशी आहे की,
सुरक्षा रक्षक ह्यांनी महिला सीए यांच्या आदेशाने एका सखी वन स्टॉप येथे दाखल असलेल्या 16 वर्षीय पीडित मुलीला पोटात दुखत असल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. पिडीत मुलगी ही 5 महिन्याची गर्भवती होती. तिचा उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडत असताना रुग्णालयाचे गेट जवळ सुरक्षा रक्षक महिला कर्मचारी दुकानातून बिस्किट विकत घेत असताना, पीडितने हाताला झटका देत पळ काढला आणि एका 30 ते 35 वर्षीय युवकाच्या दुचाकीवर बसून फरार झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 137 (2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.