आशाताई बच्छाव
जिल्हा परिषद हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टूगेदर: १४ वर्षानंतर जुन्या आठवणींना दिला उजाळा, शिक्षकांचे देखील केले गौरव
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड देगलूर –शहापूर जिल्हा परिषद हायस्कूलमधील २००९-१० च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी १४ वर्षांनी पुन्हा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. गेट टुगेदर मेळाव्यात ७५ माजी विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यावेळी शाळेतील वृक्ष लागवडीचे आयोजन करण्यात आले आणि त्या वृक्षाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
वृक्ष लागवड कार्यक्रमाचा भाग म्हणून, शाळेतील काही गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना पुढील काही दिवसांत शालेय साहित्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या गेट टुगेदरमध्ये शाळेतील माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. शासकीय क्षेत्र, पत्रकारिता, व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेतील शिक्षकांची आणि शाळेची कृतज्ञता व्यक्त केली. वृक्ष लागवड आणि आर्थिक मदतीचा निर्णय यावेळी घेतला गेला.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक संजय सिंग राजपूत आणि आनंद रेनगुंटवार यांचं मार्गदर्शन होतं. तसेच अमोल चिंतलवार, प्रवीण सुरकुंटे, वसीम शहापूरकर, शशांक शेषनगार, शिवदास भंडारे, राम ओसावार आणि इतर सहकारी मित्रांचे योगदान महत्त्वाचे ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.