आशाताई बच्छाव
भोरस फाट्याजवळ दोघांना मारहाण – चार जणांवर गुन्हा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील भोरस फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला इको कार मधून आलेल्या चौघांनी दोन जणांना लाकडी काठीने व रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि
20/12/2024 रोजी दुपारी 3-45 वाजेच्या सुमारास घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की फिर्यादी निलेश गुलाब पाटील 27 धंदा शेती व ऊसतोड मुकादम, रा. वाकडी ता. चाळीसगाव यांचे वडील गुलाब मोहन पाटील यांनी भास्कर सुकलाल मालचे रा. सायने ता. साक्री जि धुळे यास सन 2024-2025 हया वर्षाकरीता 20 मजूर पुरवण्यासाठी सहा लाख रुपये दिले होते.
ते मजूर पुरवत नसल्याने भुषण दिपक पाटील, निलेश पाटील व गुलाब पाटील हे साक्री येथे स्वीफट गाडी क्रं MH 14GY 6446 ने गेले होते त्याठिकाणी मालचे याचेशी बोलने करून चाळीसगाव कडे परतत असताना भोरस फाट्यावर 20 रोजी दुपारी 3-45 वाजेचे सुमारास गाडी रोडच्या बाजुला थांबवून निलेश व भूषण दोघे लघवी करण्यासाठी जात असतांना पांढ-या रंगाची विना नंबरची इको गाडीतुन भास्कर मालचे त्याचा शालक व दोन अनोळखी इसम (नाव माहित नाही) गाडीखाली उतरले
व भास्कर मालचे याने तुम्ही साक्रीला का थांबले नाही – असे बोलुन शिवीगाळ करु लागला त्यास शिवीगाळ करु नको असे बोलताच
त्याने तसेच त्याचे शालकाने त्यांच्या इको गाडीतुन एक लाकडी काठी व रॉड काढुन मी तुम्हाला पैसे देणार नाही तुमच्याने जे होइल ते करा असे बोलुन भास्कर मालचे याने त्याचे हातातील लाकडी काठीने राहुल पाटिलच्या उजव्या दंडावर, उजव्या खांदयावर व पायावर मारहाण केली.
तसेच त्याच्या सोबतचे अनोळखी लोकांनी चापटाबुक्यांनी मारहाण केली. भुषण पाटील यांना देखील भास्कर मालचे याने काठीने व त्याचे शालकाने रॉडने भुषण पाटील यांना हातापायावर, पाठीवर मारहाण केली व भास्कर मालचे याने शिवीगाळ करीत मला परत पैसे मागितले तर तुमच्या घरी येवुन तुम्हाला मारीन अशी धमकी देवुन इको गाडीने निघुन गेले.
याप्रकरणी निलेश गुलाब पाटील यांच्या फिर्यादीवरून भास्कर मालचे रा. सायने ता. साक्री जि. धुळे तसेच भास्कर मालचे चा शालक नाव माहीत नाही व दोन अनोळखी इसम यांचे विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रवीण सपकाळे करीत आहेत.