आशाताई बच्छाव
डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात गणित दिवस साजरा
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- डॉ.सौ.प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय, चाळीसगाव येथे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त २२ डिसेंबर जागतिक गणित दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश सोनवणे सर होते. सोबत ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वराडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहिली.
गणित दिनानिमित्त इ.४थी ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी गणितातील संबोध, सूत्रे व गणितीक्रिया सोप्या पद्धतीने समजण्यासाठी विविध प्रकारचे सुमारे ७० माॅडेल्स बनविली होती. व रांगोळी स्पर्धेत विविध भौमितिक आकारातील रांगोळी व गणितीय रचना असलेल्या रांगोळ्या यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्या. व त्यांची पाहणी मुख्याध्यापक रमेश सोनवणे व ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वराडे सर यांनी केली व याबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सूत्रसंचालन देवेंद्र दाभाडे यांनी केले तर आभार श्रीमती.पुनम पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश साळुंखे व श्रीमती.मोनाली पाटील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.