आशाताई बच्छाव
शिवनेरी येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन.
देगलूर -नांदेड गजानन शिंदे प्रतिनिधी
नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ मध्ये सिताराम पवार यांच्या घरापासून ते माळेगावकर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी माजी नगराध्यक्ष शंकर कंतेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनुसयाबाई सिताराम पवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रभागातील दिलीप पेन्शलवार, अशोक गुंडाळे, अशोक कुलकर्णी रावणगावकर, राजा कांबळे, बोयेवार, भाजपचे माजी शहराध्यक्ष गंगाधर दाऊलवार, भीमराव भाटापूरकर,
युवा मोर्चा शहराध्यक्ष सौरव मधूरवार, मधुकर पोलशेटवार, हणमंत पदलवार, सुरेश रायलवार, मोहन पवार, तानाजी वाघमारे, धम्मा सोनाळकर, तानाजी वाघमारे, चंद्रकांत देगावकर, राहूल वानखेडे, किरण कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितले की, शहरातील प्रभाग क्र ११ आणि १२ मधील विकास कामासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडून जवळपास दीड कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. येणाऱ्या काळात
प्रभाग क्रमांक १२ मधील विकासासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी या भागाकडे कायम दुर्लक्ष केले होते त्यामुळे या भागातील रस्त्याच्या बांधकामासाठी तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी निधी दिला असल्याचे कांबळे म्हणाले. शिवनेरी भागातील रस्ते असतील किंवा नाल्याचे बांधकाम असेल यासाठी आ. जितेश अंतापूरकर यांच्याकडून निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष शंकर कंतेवार यांनी उपस्थित नागरिकांना दिली.