आशाताई बच्छाव
डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान पुस्तक हे शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा. :लक्ष्मण कांबळे
.
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब आणि शालेय पाठ्य पुस्तक शिक्षण विभाग पुणे तसेच या संदर्भात येणारे सर्व शिक्षण विभाग याचे कडे दिनांक १६डिसेंबर २०२४ रोजी लक्ष्मण कांबळे यांनी ईमेल द्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे इतर विषय अभ्यास क्रमात असतात त्याचं प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान हे पुस्तकं प्रत्येक विद्यार्थ्यांना समजेल व समाज हा एकोप्यात कसा ठेवता येईल हे कळून येईल प्रत्येकाला संविधानाचे महत्व कळेल कानुन कायद्याची जाणीव होईल या उद्देशाने शालेय अभ्यास क्रमात भारतीय संविधानाचा समावेश करावा अशी विनंती मागणी केली आहे
तसेच मुख्यमंत्री यानी मागणी कडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकारी, व कार्यालयास आदेशनवित करून कार्यवाही करणेस विलंब लागू नये याकडे ही लक्ष द्यावे असे ही लक्ष्मण कांबळे यांनी निवेदनात म्हटल आहे.