आशाताई बच्छाव
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्णीचा नेवासे तालुक्यात जल्लोष
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेवासे तालुक्याच्या वतीने भाजपचे नितीन दिनकर यांनी स्वागत केले.
कुकाणे/नेवासा कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी| मंत्रीपदाची राधाकृष्ण विखे यांनी शपथ घेताच नेवासे तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात आला. भाजप नेते नितीन दिनकर, विधानसभा संयोजक सचिन देसरडा, ऋषिकेश शेटे मित्र मंडळ, गणेश चौगुले मित्रमंडळ आदी समर्थकांनी मंत्रीपदाचे स्वागत केले. नेवासे फाटा, घोडेगाव, सोनई, बेलपिपंळगाव, कुकाणे, भेंडे येथे जल्लोष करण्यात आला. माळीचिंचोरा येथे भाजयुमोचे प्रताप चिंधे, आदिनाथ पटारे, कुकाण्यात मछिंद्र कावरे व अब्दुल शेख मित्र मंडळ, जेऊर हैबतीत रावसाहेब फुलमाळी आदींनी आनंद व्यक्त केला. घोडेगाव येथे सचिन देसरडा, सरपंच राजेंद्र देसरडा, विजय आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला.