Home बुलढाणा ब्रेकिंग! काळजाचा थरकाप उडवणारा अपघात ! आयशर व एसटी समोरासमोर धडकली! –...

ब्रेकिंग! काळजाचा थरकाप उडवणारा अपघात ! आयशर व एसटी समोरासमोर धडकली! – दोन ठार तर 20 प्रवासी जखमी !

72
0

आशाताई बच्छाव

1001051436.jpg

ब्रेकिंग! काळजाचा थरकाप उडवणारा अपघात ! आयशर व एसटी समोरासमोर धडकली! – दोन ठार तर 20 प्रवासी जखमी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- सिंदखेडराजा जालना येथून सिंदखेड राजाकडे मार्गस्थ होत असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशरने जबर धडक दिल्याने भीषण अपघात होऊन बस मधील 2 प्रवाशांचा मृत्यू झाला असून जवळपास
20 प्रवासी जखमी झाल्याची घटना समोर येत आहे.

एम एच 14 बीटी 4276 क्रमांकाची राज्य परिवहन महामंडळाची बस जालना येथून सिंदखेडराजा कडे येत होती. दरम्यान सिंदखेड राजा वरून येणाऱ्या एम एच 13 ए एक्स 2682 आयशरने नाव्हा या ठिकाणी समोरासमोर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये एसटी बस मधील दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाल्याची बातमी असून एसटी बसचा वाहक देखील गंभीर झालाय. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here