Home जालना मानवी अधिकार दिन उत्साहात संपन्न सर्व भारतीयांनी बंधुता संकल्पना मनात रुजवावी                                     ...

मानवी अधिकार दिन उत्साहात संपन्न सर्व भारतीयांनी बंधुता संकल्पना मनात रुजवावी                                      – सरकारी अभियोक्ता वर्षा मुकीम

17
0

आशाताई बच्छाव

1001034997.jpg

 

मानवी अधिकार दिन उत्साहात संपन्न

सर्व भारतीयांनी बंधुता संकल्पना मनात रुजवावी

– सरकारी अभियोक्ता वर्षा मुकीम

 

जालना, दि.10(जिमाका) : 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत असतो. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे तत्व नमुद केले आहेत. या चार तत्वांचे पालन म्हणजेच मानवी अधिकार होय. नागरिकांनी आपल्यासह दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा प्रथमत: विचार करणे गरजेचे असून सर्व भारतीयांनी बंधुता संकल्पना मनात रुजवावी,  असे प्रतिपादन सरकारी अभियोक्ता वर्षा मुकीम यांनी केले.

जिल्हाधिकारी  कार्यालयातील महसूल भवनात मंगळवार दि.10 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता मानवी हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. महेश धन्नावत, तहसीलदार प्रणाली तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरकारी अभियोक्ता श्रीमती मुकीम म्हणाल्या की, 1948 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 30 मानव अधिकाराचे घोषणापत्र स्विकारले. तर 1993 पासून भारतात मानव अधिकार कायदा लागू करण्यात आला. आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन झाला. भारतीय संविधानाने दिलेले हक्क हिरावल्यास ते मिळवून देण्याचे काम मानवाधिकार आयोग करतो. जीवनात मानवाला उत्कर्ष साधायचा असेल तर सर्वांना माणसाप्रमाणे जगू देणे महत्वाचे आहे. प्रत्येक मानवाला नेहमी आपल्या कर्तव्याची जाण हवी. मानवाची उत्क्रांती सांगुन समाजात जीवन जगत असतांना झालेल्या स्थितीबदलाचा आलेखही त्यांनी यावेळी मांडला.

 

Previous articleशेगाव ( तिर्री ) येथे 12 डिसेंबर रोजी दुय्यम कव्वालीचे आयोजन
Next articleप्रत्येकाच्या हक्कांच्या रक्षणामुळे लोकशाही बळकट  – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here