Home बीड परळीत दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा हा खंडणीच्या उद्देशानेच – डॉ. बालाजी...

परळीत दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा हा खंडणीच्या उद्देशानेच – डॉ. बालाजी फड

74
0

आशाताई बच्छाव

1001026117.jpg

परळीत दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा हा खंडणीच्या उद्देशानेच – डॉ. बालाजी फड

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०७ डिसेंबर २०२४ परळी शहरात डॉक्टरांना बदनाम करण्याचे षडयंत्र माझ्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा हा केवळ खंडणीच्या उद्देशानेच दाखल करण्यात आलेला आहे. तो पूर्णपणे खोटा आहे, याबाबत पोलिसांना आठ दिवसापूर्वी मी लेखी तक्रार दिल्यानंतरही माझ्यावर गुन्हा दाखल झाला असे मत परळी येथील बालरोग तज्ञ डॉ. बालाजी फड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. तसेच परळीतील डॉक्टरांना बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात असल्याचेही ते म्हणाले. याबाबत पत्रकारांशी बोलताना डॉ. बालाजी फड पुढे म्हणाले की, माझ्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेविरोधात दि. २७ नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी परळी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यामध्ये मला पैशाची मागणी करण्यात येत असून विनाकारण त्रास देण्यात येत आहे असे नमूद केले होते. परळीतील संभाजीनगर पोलीसांनी त्यावेळी गुन्हा दाखल केला नाही. परंतु ०२ डिसेंबर रोजी या महिलेने माझ्या रुग्णालयात येऊन माझ्यासह पत्नी व माझ्या कर्मचाऱ्यास मारहाण केली व आमच्यावरच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. आणि पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखलही केला. सदर महिलेने विनयभंग व मारहाणीचा जो गुन्हा दाखल केला तो गुन्हा माझ्या डॉक्टरी पेशाची बदनामी करून माझ्याकडून खंडणी वसूल करण्यासाठीच दाखल केला असून सदरील महिला प्रचंड फ्रॉड असून या महिलेकडे दोन आधार कार्ड असल्याचे ते म्हणाले, मी मागील 18 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा देत आहे. प्रमाणिकपणे सेवा देणाऱ्या व्यक्ती बदनाम करण्याचे काम केले जात आहे. हे षडयंत्र परळीतील समाजाने हाणून पाडले पाहिजे. व सत्य ओळखून या प्रवृत्तींना वेळीच पोलीस प्रशासनाने पायबंद केले पाहिजे. असे पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. बालाजी फड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here