आशाताई बच्छाव
महाराष्ट्र राज्यातील साखर कामगार 16 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –महाराष्ट्र राज्यातील साखर कामगार 16 डिसेंबर 2024 पासून कामगाराच्या विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर असल्याची माहिती पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे युनियन पदाधिकारी यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील साखर कामगार याचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने साखर कामगार युनियनच्या वतीने गेल्या अनेक दिवसापासून मागण्या सुरूच आहेत पण सहकार क्षेत्रातील साखर कामगार यांच्या मागण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज पूर्ण सहकारी साखर कारखाना येथे 16 डिसेंबर पासून बेमुदत उपोषणावर जाणार असल्याची माहिती दिली आहे
महासंघ व प्रतिनिधी मंडळ यांच्या नेतृत्वाखाली त्रिपक्ष समिती गठित करणे .
राज्यातील साखर कामगार वेतन वाढ अंतरिम वाढ पाच हजार रुपये थकीत वेतन रोजंदारी कंट्राती नैमित्तिक व तात्पुरते कामगारांना त्रिपक्ष समितीच्या कराराची अंमलबजावणी करणे .
स्थानिक पातळीवरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे व इतर सर्व प्रलंबित प्रश्नावर निर्णय होईपर्यंत बेमुदत संपावर जातील अशी पूर्णा सहकारी साखर कारखान्यातील सर्व कामगारांच्या द्वारे सभेत एकमताने निर्णय घेण्यात आला .
सभेला अध्यक्ष मुंडे तात्या सहसचिव, आनंदराव वायकर, यांनी मार्गदर्शन केले .
युनियन अध्यक्ष लोखंडे, कार्याध्यक्ष रघुनाथ डाखोरे, सचिव नवनाथ मुळे, कोषाध्यक्ष डाखोरे ,उपाध्यक्ष श्याम शिंदे, बालाजी बेटकर ,दिलीप हजगुडे, विजय दवणे, साहेबराव वाघमारे ,नागोराव नादरे , युनियन कार्यकर्ते बहुसंख्येने कामगार कर्मचारी उपस्थित होते .
प्रास्ताविक रघुनाथ डाखोरे यांनी केले व आभार मानले