आशाताई बच्छाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला – अँड.मनोज संकाये
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन!
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/परळी दि ०६ डिसेंबर २०२४ भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून या लोकशाहीमध्ये दिनदलित आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र संघर्ष करून न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी केले. परळी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन केले. यावेळी बाबासाहेब मुंडे, मुंजाभाऊ साठे, मकरंद नरवणे, संतोष चौधरी, प्रवीण रोडे, शिरीष सलगरे, संतोष कांबळे, वसंत मुंडे, जयसिंग रोडे, धनराज रोडे, बाळू मुंडे, बालासाहेब मुंडे, गोविंद कांदे, वैजनाथ कांदे आदी मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.