Home भंडारा वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार अड्याळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार अड्याळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

88
0

आशाताई बच्छाव

1001022023.jpg

वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार अड्याळ येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 6 डिसेंबर 2024 सायंकाळी 7 वाजता वैशाली बुद्ध विहार व सुबोध बुद्ध विहार बाजारपेठ अड्याळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी डॉ. गणेश मेश्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार धनंजय पाटील ,शिवशंकर मुंगाटे सरपंच, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, ग्रामविकास अधिकारी हिरालाल खंडाईत चिचाळ ,तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे, माझी तंटामुक्त समिती अध्यक्ष नितीन वरंटीवार ,अर्जुन जनबंधू ,ग्रामपंचायत सदस्य आशिष अंबादे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी सर्व पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत महाकारूणी तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच मुनेश्वर बोदलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभुर्णे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता वसुश्री टेंभुर्णे, सृष्टी टेंभुर्णे, साधना कासारे ,मंदिरा कोचे ,नलुबाई कराडे,
, दिनेश्वरी वानखेडे ,मीनाताई शहारे ,महादेव कोचे ,निर्भयीसाखरे व गावातील सर्व बुद्ध उपासक उपासक यांनी सहकार्य केले

Previous articleअपघाताची घटना मी आणि योगायोग, जिव्हाळयाची आपली माणसं!!
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला – अँड.मनोज संकाये
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here