Home भंडारा जगात जोपर्यंत चंद्र ,सूर्य, तारे तोपर्यंत बाबासाहेबांचे नाव अमर असणार- पत्रकार संजीव...

जगात जोपर्यंत चंद्र ,सूर्य, तारे तोपर्यंत बाबासाहेबांचे नाव अमर असणार- पत्रकार संजीव भांबोरे

52
0

आशाताई बच्छाव

1001019708.jpg

जगात जोपर्यंत चंद्र ,सूर्य, तारे तोपर्यंत बाबासाहेबांचे नाव अमर असणार- पत्रकार संजीव भांबोरे

शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्गदर्शन

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)आज 6 डिसेंब 2024 ला सकाळी 7 वाजता 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे डॉ यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि अवघ्या दीड महिन्यातच बाबासाहेब यांना मरण आले .बाबासाहेब म्हणायचे तुमच्याजवळ दोन रुपये असतील तर एक रुपया भाकरी करता खर्च करा व एक रुपया पुस्तकाकरता खर्च करा. भाकरीमुळे तुमची भूक भागेल तर पुस्तकामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल असे बाबासाहेब म्हणायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 दिल्ली येथे निधन झाले .आणि दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला मुंबई येथील चैत्यभूमीवर बौद्ध धम्मानुसार अग्नी देण्यात आले. त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने देश विदेशातून लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता येत असतात ज्या बाबासाहेबांनी दलित, शोषित, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजाला स्वातंत्र्य ,समता, बंधुत्व आणि न्याय मिळवून दिला. सन्मानाने बोलायला ,चालायला शिकवले .प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळवून दिला. आणि या जगात जोपर्यंत चंद्र ,सूर्य ,तारे राहतील तोपर्यंत बाबासाहेबांचे नाव अमर राहणार आहे. श्रामनेर बुद्धपाल, माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम, अंबादास मेश्राम, व अनेक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.अशा या महामानवास त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here