आशाताई बच्छाव
माहोरा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 06/12/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त व महामानव भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहोरा येथील बुध्द विहार येथे अभिवादन करण्यात आले. अभिवादन करण्यासाठी गावातील अनुयायी तसेच जेष्ठ गवई सर आणि माहोरा नगरीचे प्रथम नागरिक सरपंच गजानन पाटील लहाने व माहोरा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे सरपंच गजानन पाटील लहाने यांनी बोलतांना सांगितले की भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला आणि 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. डॉ. आंबेडकर हे एक महान समाजसुधारक, विद्वान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते. तसेच त्यांनी कुठलाही भेदभाव केला नाही. त्यांनी सर्वांसाठीच काम केले आहे. तसेच त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगीतले आहे. त्यानंतर गवई सर यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. व महामान डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले. यावेळी उपस्थित सरपंच गजानन पाटील लहाने, बीट जमादार गजानन गावंडे सर पोलीस, होमगार्ड हिवाळे लहाने सर ,गवई सर, पत्रकार मुरलीधर डहाके, निलेश साळवे ,दिलीप बोर्डे , राहुल सोनवणे, संदीप साळवे, शरद टोम्पे, सुभाष इंगळे, मधुकर इंगळे, चौधरी जनार्धन बोर्डे अमर साळवे पवन साळवे विशाल बोर्डे आर्यन जोगदंडे शोभाबाई सोनवणे लता बोर्डे गुंफाबाई दांडगे प्रतिभा जोगदंडे दाभाडेताई हे सर्व उपस्थित होते. या सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.