आशाताई बच्छाव
कृषी उत्पन्न बाजार समिती च्या व्यापारी असोसिएशन कडून आ. नवघरे यांचा नागरी सत्कार
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत अंतर्गत वसमत येथील व्यापारी अडते असोशियन व मापाडी हमाल असोसिएशन यांच्या वतीने आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत मोठ्या प्रमाणात आमदार राजू भैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे पाटील यांचा नागरी सत्कार ठेवण्यात आला होता कार्यक्रमाच्या ठिकाणी दुपारी अडीच वाजायच्या सुमारास मोठ्या प्रमाणात बँड व फटाक्याच्या आवाजात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बेंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व्यापारी हमाल मापारी अडते व कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत अंतर्गत व मोठा मार्केट अंतर्गत सर्व व्यापारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून आमदार नवघरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व संचालक यांच्यावतीने सुद्धा सत्कार करण्यात आला व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी अधिकारी पदाधिकारी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात आला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यापारी असोसनाने नवनिर्वाचित आमदार यांना कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्रीसाठी संपूर्ण देशभरामध्ये नावलौकिक झाली असून या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी खरेदी व विक्री असणारी ऑनलाइन बाजार समिती म्हणून राज्यातील पहिल्या नंबरची कृषी उत्पन्न बाजार समिती आज नावारूपाला आली त्यामुळे या ठिकाणी राज्यातील अनेक ठिकाणाहून व परराज्यातील मध्यप्रदेश तेलंगणा कर्नाटका आदी ठिकाणाहून व्यापाऱ्याबरोबरच हळद विक्रीसाठी शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहेत त्यामुळे वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असणाऱ्या जागेमध्ये मोठी अडचण निर्माण होत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यांच्याकडून आमदार नवघरे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकच्या कामकाजासाठी शहरालगत 20 एकर जमिनीची मागणी करण्यात आली त्यानुसार आमदार नवघरे यांच्याकडून सदरील मागणीची तात्काळ दखल घेऊन लवकरच कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सर्व यंत्रणा सुरळीत चालण्यासाठी 20 एकर जमीन लवकरात लवकर कृषी उत्पन्न बाजार समिती ला देण्यासाठी मंजुरी देण्यात आली त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या रस्त्याची काही ठिकाणी नादुरुस्त असल्याची संचालक यांच्याकडून मागणीनंतर तात्काळ दखल घेऊन नगरी विकास किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सर्व कामाची पूर्तता व व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन नागरी सत्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या व्यासपीठावर आमदार राजू भैया नवघरे यांनी त्या ठिकाणी जनतेला आपल्या संभाषणातून सांगितले.