आशाताई बच्छाव
स्त्री शक्ती प्रबोधन संवादिनी गट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
‘उमलत्या वयाशी जुळवून घेताना
स्वतःचे व्यक्तिमत्व चांगले करणे गरजेचे-विशाखा वेलणकर
जालना, दि. २९(प्रतिनिधी दिलीप बोंडे) संस्कार प्रबोधिनी विद्यालय व ज्ञान प्रबोधिनी
स्त्री शक्ती प्रबोधन संवादिनी गट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
‘ उमलत्या वयाशी जुळवून घेताना ‘ यात विशाखा वेलणकर बोलताना म्हणाल्या
की, प्रत्येकाने स्वतःचे व्यक्तिमत्व चांगले करण्यासाठी सतत कार्यरत असले
पाहिजे. असे प्रतिपादन दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,
विनायकराव देशपांडे,प्रा. केशरसिंह बगेरिया, डॉ.वैशाली पंडित,ज्ञान
प्रबोधिनीच्या हेमांगी ठाकूर,मानसी ओगले,अमिता बेहेरे,परिमला
पांडे,समृद्धी देशमुख आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉ.
वैशाली पंडित बोलताना म्हणाल्या किशोरवयीन अवस्थेत शरीरात प्रचंड बदल होत
असतात. काय करावे काय करू नये हे आपल्याला माहीत असले पाहिजे.आपली
दैनंदिनी ठरवून कार्य केल्यास शरीर तंदुरुस्त राहते.या वयात
विद्यार्थ्यांमध्ये चिडचिडेपणा होणे.यासाठी आहारचे समतोल आपल्याला राग
आला पाहिजे.यासाठी संस्कार प्रबोधिनीने उमलत्या वयाशी जुळून घेताना या
कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमास इयत्ता नववी दहावी मधील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक
ईश्वर वाघ,रामदास कुलकर्णी, रेखा हिवाळे,शारदा उगले दहिभाते, कीर्ती
कागबट्टे,स्वप्नजा खोत, सुप्रिया कुलकर्णी,माणिक राठोड,रशीद तडवी,राहुल
घोलप यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन शारदा उगले- दहिभाते व आभार मु.अ.ईश्वर वाघ यांनी मानले.
००००००००००००