आशाताई बच्छाव
धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये जिजामाता कॉन्व्हेंट अनसिंग च्या 2 विद्यार्थ्यांची निवड
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ –क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत घेण्यात घेण्यात येणाऱ्या शासकीय शालेय कराटे स्पर्धेत 14 वर्षाखालील मुले या वयोगटात
1. गुरुदत्त रामराव राठोड (वजन गट 30 ते 35 किलो)
2. ईशांत यशवंत चव्हाण (वजन गट 20 ते 25 किलो)
या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
हे विद्यार्थी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी वाशिम मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावून यवतमाळ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र झाले. व दिनांक 24 व 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे झालेल्या विभागीय शालेय स्पर्धेत वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत प्रथम क्रमांक पटकावून धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
हे विद्यार्थी दिनांक 28, 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करणार आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे कराटे प्रशिक्षक सेन्सई प्रसाद मांडवगडे (ब्लॅक बेल्ट 3 डॅन) , आपले आई-वडील व जिजामाता कॉन्व्हेंट, अनसिंग चे प्राचार्य श्री संजय चव्हाण सर यांना दिले.
सर्वांनी त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या हे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवून आपले स्वतःचे, शाळेचे, त्यांचे आई-वडिलांचे व वाशिम जिल्ह्याचे नाव लौकिक करतील अशी अपेक्षा आहे.