
आशाताई बच्छाव
साल्हेर किल्ला परिसरातील दुहेरी खुनाचा पोलिसांनी केला शिताफीने उलगडा
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
साल्हेर, बाळासाहेब निकम/राजेंद्र पाटील राऊत:- सटाणा तालुक्यातील साल्हेर किल्ल्याच्या परिसरात गत शुक्रवारी दोन पुरुषाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आले होते.त्यामुळे खळबळ उडाली होती.मात्र जायखेडा पोलिसांनी व गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने सदर खुन प्रकरणाचा उलगडा केला आहे.मयत इसमांनी अंगावर परिधान केलेल्या कपड्यांवरून व अंगावरील चीजवस्तूमुळे त्यांची ओळख पटविण्यात आली.यातील मयत हे रामभाऊ गोटीराम वाघ रा.गोपाळखडी व दुसरा मयत व्यक्ती नरेश रंगनाथ पवार रा.कळवण अशी त्यांची नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे.दोन्ही इसमांना डोक्यावर,चेह-यावर मानेवर कशाने तरी घाव घालून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जनस्थळी डोंगरावर टाकून दिले होते.त्यानुसार जायखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिस पथकाने सतत दोन दिवस साल्हेर किल्ला व केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयित विश्वास दामू देशमुख रा.केळझर ता.सटाणा ,तानाजी आनंदा पवार रा.खालप ता.देवळा, शरद उर्फ बारकू दुगाजी गांगुर्डे रा.बगडू ता.कळवण, सोमनाथ मोतीराम वाघ, गोपीनाथ सोमनाथ वाघ दोन्ही रा.गोपाळखडी व अशोक महादू भोये रा.सावरपाडा ता.कळवण यांना ताब्यात घेतले असून त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधिक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी अत्यंत शिताफीने जायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, संदीप नागपुरे,सतिश जगताप, किशोर खराटे, हेमंत गरुड,पो.ना.नवनाथ वाघमोडे, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी,योगेश कोळी, विनोद टिळे, तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पो.हवा.हेमंत गिलबिले,प्रदीप बहिरम, जायखेडा पोलिस स्टेशनचे पोउनि चेडे,पोना.जाधव, क्षीरसागर,मनसे,बारगळ यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन कोणताही सुगावा नसताना सदरच्या दुहेरी खुनाचा गुन्हा ४८ तासांच्या आत उघडकीस आणला त्यामुळे जायखेडा पोलिसांचे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.