आशाताई बच्छाव
भंडारा जिल्ह्यात विद्यमान आमदार शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर , तुमसर अजितदादा पवार राष्ट्रवादीचे पक्षाचे राजू कारेमोरे तर साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले विजयी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा मतमोजणीत भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार भंडारा विधानसभेतून नरेंद्र भोंडेकर ,तुमसर मधून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे राजू कारेमोरे तर राष्ट्रीय काँग्रेसचे साकोली मधून नाना पटोले विजयी झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की ,भंडारा मतदारसंघात आणि तुमसर मतदारसंघात महायुतीला वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी झाले. तर साकोलीत काँग्रेसने निसटता विजय मिळविला .साकोली मतदारसंघात मतमोजणीच्या सुरुवातीला अत्यंत चुरशीच्या झालेल्या मतमोजणी मध्ये बीजेपी चे उमेदवार सोमदत्त करंजेकर यांनी मतदानाच्या पेटीमधून वर्चस्व दाखविले .तर पोस्टर मतदानातून दिलेल्या कर्मचाऱ्यांनी नाना पटोले यांना जीवनदान दिले आणि 212 मतांनी विजयी ठरले .विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले .त्यामध्ये जिल्ह्यातील भंडारा, तुमसर , साकोली या तिन्ही विधानसभा क्षेत्रात सरासरी 70.87% मतदान झाले होते .हे मतदान मागील वेळेपेक्षा अधिक असल्याने सर्वांची धाकधूक वाढली होती. दरम्यान अनेक चर्चांना उधान सुद्धा आले होते. मात्र 23 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मतमोजणीत चर्चांना पूर्णविराम मिळाला. भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे नरेंद्र भोंडेकर यांना विसाव्या फेरी अखेर 80 964 मते मिळाली तर महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार पूजा ठवकर यांनी 54 हजार 419 मते प्राप्त केली .विसाव्या फेरी अखेर भोंडेकर यांनी 26545 मतांची आघाडी घेतली होती. तुमसर विधानसभा क्षेत्रात महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजू कारेर्मोरे यांनी विसाव्या फेरी अखेर 110,0021 लाख मते घेतली तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चरण वाघमारे यांनी 61 हजार 842 मध्ये घेतली होती. याप्रमाणे राजू कारेमोरे यांनी विसाव्या फेरी अखेर अखेर 55,19 80 मतांची आघाडी घेतली होती .तर साकोली विधानसभा संघातील निकाल मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आलटून पालटून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर व काँग्रेसचे नाना पटोले आघाडी मिळवीत होते .अखेर 28 व्या फेरी अखेर मतमोजणी नंतर काँग्रेसचे नाना पटले हे 208 मतांनी विजयी ठरले .दरम्यान भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांनी साकोली विधानसभा मतदान संघाकरता दुसऱ्यांदा मतमोजणी करता मतमोजणीचा अर्ज दाखल केला होता .मात्र त्याच्या काहीही परिणाम झालेला नाही. यावर्षीचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील अनेक राजकीय पार्टीच्या पार्श्वभूमीवर आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली आघाडीला बहुमत मिळाले होते .शिवसेनेने भाजपाची युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतर 2022 मध्ये शिवसेना पक्ष फुट आणि 2023 ला राष्ट्रवादी पक्ष फुटी नंतर भाजपासोबत चे महायुतीचे सरकार महाराष्ट्राला लाभले आहे. या निवडणुकीत मिळालेल्या महायुतीच्या यशामुळे नेत्यांची डोळे पांढरे झाले असतील यात काही शंका नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भंडारा ,तुमसर, व साकोली विधानसभा मतदारसंघात पक्ष व अपक्ष एकूण 50 उमेदवार रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीत साकोली विधानसभेत काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांना एक लाख 17 हजार पाचशे मते मिळाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांना फक्त 95 हजार दोनशे मते मिळाली .तर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांना 91 हजार मते मिळाली होती. मात्र आता भाजपाला 95 हजार मते मिळाली. याचा अर्थ भाजपाचे मते कमी झाली नसून काँग्रेस व नाना पटोले यांचे मते कमी झाले .याचा अर्थ असा की सोमदत्त करंजेकर यांनी काँग्रेसची मते घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपा मधून तिकीट मिळाल्यामुळे भाजपाचे बरेचचे कार्यकर्ते नाराज झाले हे मतदान काँग्रेसला न देता ते डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना मिळाली .त्यामुळे नाना पटोले यांचे मताधिक्य न वाढता याचा सरळ फायदा भाजपाला झाला .लोकसभेला भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर नाराज असलेला कार्यकर्त्यांनी सरळ मतदान काँग्रेसला दिल्यामुळे याचा फायदा काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना झाला होता .भाजपाने डमी उमेदवारी दिली असे म्हणत म्हणता मतदारांनी मात्र ईव्हीएम मशीन मध्ये भाजपाला मतदान करून अविनाश ब्राह्मणकर यांना आघाडी दिली .मात्र पोस्टल टपाल मतदानात नाना पटोले यांचा विजय झाला .एकंदरीत डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्यामुळे नुकसान हे काँग्रेसला आणि फायदा भाजपाला झालेला दिसत आहे .आणि साकोलीत काहीही असो पण साकोलीच्या गड नानाभाऊ पटोले यांनी टपाल पोस्टर मतदानाच्या भरोशावर विजयाची माळ गळ्यात घातली यात तीळमात्र शंका नाही. नरेंद्र भोंडेकर यांना एक लाख 26 हजार 516 मते मिळाली तर काँग्रेसच्या पूजा ठवकर यांना 87 हजार 864 मते मिळाली. यात नरेंद्र भोंडेकर विजयी झाले. तुमसर चे आमदार राजू कोरेमोरे यांना एक लाख 34 हजार 732 मते मिळाली तर महायुतीचे उमेदवार चरण वाघमारे यांना 70,802 मते मिळाली तर साकोलीचे विद्यमान आमदार नाना पटोले यांना 96 हजार 795 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांना 96 हजार 587 मते मिळाली यात पोस्टल मतदानात नाना पटोले यांचा निसटता 212 मतांनी विजय झाला.