आशाताई बच्छाव
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिंगोली जिल्ह्यातील तिनहि विधानसभा मतदारसंघात महायुती चे उमेदवार विजयी झाले आहेत पन जिल्ह्याच्या पालकमंत्री कोनाची वर्णी लागणार याकडे तिन्हि मतदार संघातील कार्यकर्ते व नेते यांच्यातून दबक्या आवाजाने सूर निघत असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या अनेक दिवसापासून जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्याने जिल्हाभरातील मागासले पण भरून काढण्यासाठी स्थानिक जिल्ह्यातील पालकमंत्री असणे अत्यंत आवश्यक आहे असे हिंगोली जिल्ह्यातून नेते व कार्यकर्ते यांच्यातून बोलले जात आहे निवडणूक संपली व आपले उमेदवार आपण निवडून आणले पण आता जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आपलाच्याच आमदाराची वनी लागावे यासाठी तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व नेते यांची चर्चेला उधाण आले आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे लवकरच उद्या 25 नोव्हेंबर रोजी शपथविधी पार पडल्यानंतर राज्य व कॅबिनेट मंत्रीपदी कोणा कोणाची वर्णी लागणार त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याच्या स्थानिक चा आमदार यांची वर्णई लागावी असे बोलले जात आहे .
हिंगोली जिल्ह्यातील महायुतील हिंगोली वसमत कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे तीन्हि उमेदवार निवडुन आल्याने हिंगोली जिल्हाच्या पालकमंत्री कोन आसेल यांची चर्चा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात सुरू आहे
महाविकास आघाडी चामोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.
तर हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात महायुती मधिल भाजप चे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे तिसर्यादा निवडुन आल्याने मुटकुळे यांनाच हिंगोली जिल्ह्यच्या पालकमंत्री विजमान होण्याची संधी उपलब्ध होणार आहे अशी हिंगोली मतदार संघात सुरू आहे.तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी शिवसेना शिंदे गटाचे संतोष बागर याना कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानही दुसर्यां वेळेस संधी उपलब्ध दिली त्यामुळे निश्चितच हिंगोली जिल्ह्य पालकमंत्री पदांची सधी मिळणार का वसमत विधानसभा मतदारसंघातुन विद्यमान आमदार राजू भैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे पाटील याना मोठ्या फरकाने वसमत विधानसभा मतदारसंघातील मतदार यांनी निवडुन दिले आहे पन वसमत येथे पुर्णा सा.का.रोडवरील झालेल्या जन आशीर्वाद यात्रा मा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शब्द दिला होता पुन्हा वसमत विधानसभा मतदारसंघात राजू भैया नवघरे यांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे त्यांना राज्यमंत्रीपदाची मी आजच शब्द देतो असे बोलले होते त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे हिंगोली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व नेते मतदार बंधू यांचे लक्ष लागले आहे राजू भैया नवघरे यांच्या प्रतिस्पर्धी विरोधी म्हणून माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून ते विजयी झाल्याने संपूर्ण जिल्हाभरात चर्चेला उधाण आले आहे त्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांची हिंगोली जिल्हा पालकमंत्री मधून वर्णी लागणार अशी ही बोलल्या जात आहे.