आशाताई बच्छाव
मा. प्रा. चंद्रकांत सोनवणे ठरले किंग मेकर.
चोपडा जळगाव प्रतिनिधी :
सुरेंद्र बाविस्कर.
चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेनेचे उमेदवार मा प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनवणे यांचा दणदणीत विजय.
चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेनेचे अधिकृत माननीय प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी
1,22,826 मते घेऊन दणदणीत विजय प्राप्त केला आहे यात विरोधी पक्षाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांचा 33,313 मतांनी पराभव केलेला आहे त्यांना फक्त 90,513 मतांचा पल्ला गाठता आला आहे अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढाईत संपूर्ण तालुका व जिल्ह्याचे लक्ष लागून होते प्रत्येक फेरीत चंद्रकांत सोनवणे यांनी आघाडी मिळवत विजयाची धुरा उडवली त्यांनी दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणली आहे .
सौ लताताई सोनवणे यांचा विजय पकडता त्यांनी हॅट्रिक मिळवली असे म्हणणे वावगे ठरणार नाही ,
लवकरच त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडेल असा विश्वास मतदार संघातील जनतेने व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.