आशाताई बच्छाव
बीड जिल्ह्यातील विधानसभा २०२४ निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व कायम
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड दि:२३ नोव्हेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकालाची मतमोजणी आज सकाळपासून चालू झाली असता बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारत बीड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व कायम प्रस्थापित केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालसाठी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या मतमोजणीत बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली असून बीड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. सर्व महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित असलेल्या परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार) गटाचे उमेदवार धनंजय पंडितराव मुंडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे. बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवार परळी वैजनाथ विधानसभा धनंजय पंडितराव मुंडे (रा.कॉं.अ.प.गट) १,९४,८८९ बीड विधानसभा संदिप क्षिरसागर (रा.कॉं.श.प.गट) ५,००० पेक्षा जास्त, आष्टी विधानसभा सुरेश धस (भाजप) ७५,००० पेक्षा जास्त, गेवराई विधानसभा विजयसिंह पंडित (रा.कॉं.अ.प.गट) ४२,००० केज विधानसभा नमिता मुंदडा (भाजप) २७,०० माजलगाव विधानसभा प्रकाश सोळंके (रा.कॉं.अ.प.गट) ५,००० बीड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला एकच जागा मिळाली असून एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. महायुतीचे पाच उमेदवार निवडून आल्याने बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत शिक्कामोर्तब करत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.