Home नाशिक चारित्र्य संपन्न लोकप्रिय नेतृत्व – बंडुकाका बच्छाव होणार आमदार ? मतदारांमध्ये चर्चा

चारित्र्य संपन्न लोकप्रिय नेतृत्व – बंडुकाका बच्छाव होणार आमदार ? मतदारांमध्ये चर्चा

26
0

Yuva maratha news

1000972889.jpg

चारित्र्य संपन्न लोकप्रिय नेतृत्व – बंडुकाका बच्छाव होणार आमदार ? मतदारांमध्ये चर्चा

A.B.N.MIDEA NETWORK. ब्युरो टीम नाशिक

मालेगाव सारख्या तालुक्यात नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद पुरुषोत्तम बच्छाव म्हणजेच बंडुकाका बच्छाव हे नाव तालुक्यासह पंचक्रोशीत आदराने नागरिकांच्या तोंडून घेतले जाते.हे शाश्वत आहेच. बंडूकाका गेल्या २५ – ३० वर्षांपासून सामाजिक कार्यात राहून राजकारणात कार्यरत आहेत. मालेगाव बाजार समितीत निवडून येऊन समितीचे त्यांनी सभापती पदी विराजमान झाले.त्यावेळी बंडूकाका बच्छाव यांनी शेतकरी हिताचे अनेक प्रश्न सोडविले होते . हे प्रश्न सोडवत असताना शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिल्या.तरीही बंडूकाका बच्छाव हवेत न उडता पाय जमिनीवरच ठेऊन शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने न्याय देत राहिले. त्यामुळे बंडू काका आज मालेगाव बाह्य बरोबरच तालुक्यातील जनतेच्या मना – मनात ठाण मांडले.

व बंडू काका बच्छाव यांनी बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले यात
१) बाजार समिती आवारातील दुर्लक्षित ग्रामदेवता मसोबा महाराज मंदि राजा द्वार करीत श्री बंडू काकांनी आपल्या विकास कामांचा शुभारंभ केला
२) मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे नामकरण आणि सुशोभीकरण करून बाजार समितीची शोभा वाढविली
३) बाजार समितीचे इतिहासात प्रथमच सामाजिक उपक्रम रुग्णवाहिका व वैकुंठ रथ सेवेचा श्री बंडू काकांनी शुभारंभ केला
४) पिण्याच्या पानासाठी लावळगाव साखर कारखान्याकडून निधी उपलब्ध करीत भव्य जलकुंबाची उभारणी केली बाजार समितीचे लाखो रुपये वाचून श्री बंडू काकांच्या कार्यपद्धतीची दिसून येते अनोखी रीत
६) बंद पडलेल्या भगनावस्थेतील झोडगे उत्पादन समितीचे बंडू काकांनी काय वर्षानंतर आपल्या सभापती कार्यकाल पुन्हा नव्या उमेदीने सुरू केली
व असे अनेक उपक्रम बंडू काका हे राबवत असतात
सध्या बंडूकाका बच्छाव विधानसभा निवडणुकीत उभे राहून रिक्षा निशाणी घेऊन निवडणुकीस सामोरे जात आहे. त्यामुळे मालेगाव बाह्य मधील जनतेत आनंद पसरला आहे. जनतेच्या त्या आनंदाचे खरे रहस्य म्हणजे त्यांनी माणुसकी जपून मानस कमवली. पण पैसा नाही कमवला .त्यांच्यातील मनमिळावू सुसंस्कारित पणा जनतेस भावला .बंडुकाका बच्छाव आजही प्रेमळ पणाने जनतेत राहूनच जनसेवा करत असल्या कारणाने मालेगाव बाह्य मधील मतदारांनी बंडुकाका यांचे नेतृत्व स्वीकारले असल्याचे जनतेत चर्चा आहे. त्यामुळे बंडुकाका बच्छाव यांच्या स्वभावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचे येथील जनतेने युवा मराठा न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

हवेत न उडता पाय जमिनीवर ठेऊनच आणि जनतेत मिसळूनच कोणतेही काम करावे असेही बंडूकाका बच्छाव यांनी जनतेस सांगितले. बंडुकाका यांना मालेगाव बाह्य मधील जनतेने मोठाच पाठींबा दिला असून जनतेच्या काहीही आणि कोणत्याही समस्या असो त्या सोडविण्याचे काम अगदी चुटकीसरशी बंडु काका सोडवित असतात.स्वतःच्या कुटुंबा पेक्षा मालेगाव बाह्य मधील नागरिक माझे कुटुंब आहे. असे मी मानतो. त्यामुळे मालेगाव बाह्य मधील जनता माझा विश्वास घात करणार नाहीत.असा विश्वास काका यांनी व्यक्त केला.तर अनेक ठिकाणी जनतेने स्व इच्छेने बंडु काका यांना वर्गणी जमा करून दिली गेली.त्यामुळे ह्या वेळी आम्हास परिवर्तन करायचे असून बंडु काका यांना आमदार म्हणून आम्हास बघायचे आहे असे मालेगाव बाह्य मधील नागरिकांनी युवा मराठा न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले.

काही नागरिकांनी बोलतांना सद्याच्या सरकारवर संताप व्यक्त करत सांगितले की , लाडक्या बहिणींना एका भाऊ महिन्याला १५०० रू.देतात परंतु …. १५०० रू.च्या बदल्यात भरमसाठ महागाई करून वसुली केली जात आहे. १५० ते २०० रू.किलो डाळी चे भाव वाढवले , टिव्ही , मोबाईल यांचे रिचार्ज चे डबलचे भाव वाढविले , स्टॅम्प च्या किमतीत दर वाढ केली , गॅस सिलेंडर चे भाव वाढवले मग लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० रू.देऊन फायदा काय ? असा संतप्त सवाल मालेगाव बाह्य च्या नागरिकांनी शासनाला केला आहे. निवडणूक झाल्या नंतर पुन्हा अन्य वस्तूंचे तसेच गॅस सिलेंडर चे भाव वाढविले जातील अशी भिती सुद्धा यावेळी अनेकांनी बोलून दाखविली.त्यामुळे एका भाऊच्या ह्या दुटप्पी बाबत सर्वत्र ग्रामीण भागात सुद्धा नाराजी व्यक्त केली जात आहे. भिक नको कुत्र आवर असे म्हणण्याची वेळ आम्हा नागरिकांवर ह्या शासनाने आणली असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

एकच हवा बंडु काका च आमदार हवा अशी चर्चा मालेगाव बाह्य मधील नागरिकात होत होती. यावेळी नागरिकांनी बंडू काकाची निशाणी रिक्षा व अनुक्रमांक 11 असल्याचं सांगितले

तारीख विस् रिक्षा फिक्स मालेगावका एक्का बंडु काका ” आमदार ” पक्का . अशीच चर्चा मात्र आहे.

Previous articleमहायुतीकडून जातीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न- आ. अमित देशमुख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here