
आशाताई बच्छाव
77 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी भक्तीभावाने पूर्णत्वास
मुंबईसह महाराष्ट्रातून सुमारे 20 हजार स्वयंसेवकांचा सहभाग
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ:– सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंदाचे दिव्य स्वरूप – 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन 16 ते 18 नोव्हेंबर रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली होणार असून त्याची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातून सुमारे 20 हजार महिला व पुरुष सेवादल स्वयंसेवकांनी भाग घेतला असून समागम संपन्न होईपर्यंत ते आपल्या निष्काम सेवा देत राहतील. या दिव्य संत समागमामध्ये समस्त भाविक भक्तगणांना प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ज्ञान, प्रेम आणि भक्तीचा अनुपम संगम पहायला मिळेल, यात तिळमात्र शंका नाही. उल्लेखनीय आहे, की जगभरातील समस्त भक्तगण दरवर्षी या भक्ती उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात ज्यामध्ये विविध संस्कृती व सभ्यतांचा अद्भुत संगम आपल्या बहुरंगी छठा घेऊन अनेकतेत एकतेचे अनुपम दृश्य प्रदर्शित करत विश्वबंधुत्वाची साकार चित्र प्रस्तुत करत असते. या भव्य-दिव्य आयोजनामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक-भक्तगण सहभागी होऊन सतगुरुचे दिव्य दर्शन आणि अनमोल प्रवचनांचा लाभ प्राप्त करतील.या पावन पर्वाची तयारी भक्तगणांकडून पूर्ण समर्पण व सजगतेने केली जात आहे. समागम परिसर भव्य रूपात सजविण्यात आला असून त्यामध्ये विशाल पंडालामध्ये सर्वांच्या बसण्याची उचित व्यवस्था करण्यात आली आहे. समागम परिक्षेत्रामध्ये जागोजागी एलईडी स्क्रीन लावण्यात येत आहेत ज्या द्वारे मंचावर होणारा प्रत्येक कार्यक्रम हजारोंच्या संख्येमध्ये उपस्थित भक्तगण स्पष्टपणे पाहू शकतील.