Home बीड बीड जिल्ह्यातील चौसाळा बायपासवर एसटीचा अपघात; २५ जण जखमी सुदैवाने जीवितहानी नाही

बीड जिल्ह्यातील चौसाळा बायपासवर एसटीचा अपघात; २५ जण जखमी सुदैवाने जीवितहानी नाही

62
0

आशाताई बच्छाव

1000902540.jpg

बीड जिल्ह्यातील चौसाळा बायपासवर एसटीचा अपघात; २५ जण जखमी सुदैवाने जीवितहानी नाही

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि: २९ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या तुळजापूर – धुळे बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना धुळे – सोलापूर महामार्ग बायपासवर पारगाव (ता. वाशी) येथे आज सकाळी साडेअकरा वाजता सुमारास घडली आहे. यामध्ये २५ प्रवासी जखमी झाले असून त्यांना पारगाव येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आगारची बस क्रमांक एम. एच. २० बी एल १८९५ ही बस तुळजापूर येथून धुळे येथे जात होती. दरम्यान ही बस पारगाव ता. वाशी येथे आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस सरळ रस्त्याच्या खाली उतरून शेतात जाऊन पलटी झाली. या अपघातात बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. यांची संख्या वाढूही शकते. अपघात घडतात काही प्रवासी व पारगाव येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. जखमींना तातडीने पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची नावे अद्याप समजू शकले नाहीत.

Previous articleबीडमध्ये डॉ. योगेश क्षीरसागरच बाजीगर ठरले; मुंडे बंधू – भगिनींनी केले प्रयत्न
Next articleदिवाळी व मंडई च्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here