Home विदर्भ वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे दोन गटात जाग्यावरून मोठावाद एकमेवर दगडफेक करून...

वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे दोन गटात जाग्यावरून मोठावाद एकमेवर दगडफेक करून अनेक जखमी

32
0

आशाताई बच्छाव

1000902498.jpg

वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे दोन गटात जाग्यावरून मोठावाद एकमेवर दगडफेक करून अनेक जखमी

हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ.जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथे गेल्या तीन वर्षापासून जागेचा वाद सुरू आहे. मातंग समाज व बोध्द समाज यांच्यातील जाग्यावरून हा असलेला वाद हा आधीक मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे.
गावातील धार्मिक स्थळ असलेल्या जागेवरून हा वाद निर्माण झाला आहे एकंदरीत 13 गुंठे जागेवरून हा वाद निर्माण झाला असल्याचे माहिती मिळते पन ह्या जागा संदर्भात महसूल प्रशासन विभाग या संदर्भात आधीक माहिती आहे कि एकुनच किती जागा होती त्यापैकी किती जागा कोनत्या धार्मिक स्थळास आहे व उर्वरित किती जागा उपलब्ध आहे.
आज रोजी झालेला हा वाद जो निर्माण झाला तो वाद दोन गटांतील सुरू होता तर
एका गटाने जाहीर ध्वज उभारला.
हा प्रकार दुसर्यां गटाला कळताच त्याठिकाणी मोठा जमाव एकत्र आल्याने दोन्ही गटात एकमेकांना बोलण्यावरून मोठा वाद वाढत गेला व सदरील वादाचे रूपांतर हाणामारी व एकमेकांच्या अंगावर दगडफेक करून दोन्ही गटातील अनेक या वादात जखमी झाले आहेत सदरील बाबीची माहिती नंतर वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन ला मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल काचंडे, उपनिरीक्षक संतोष मुपडे, अंभोरे, शेख जावेद, ढवळे, विजय उपरे, अरविंद राठोड यांच्या घटनास्थळी धावघेवुन दोन्ही गटालतील वाद मिटवण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केले
वरिष्ठ पोलीस आधिकारी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही गटावर पोलीस प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थीत असताना एकमेकांवर तुफान दगडफेकीत सुरू होती
पोलीस कर्मचारी मोठया प्रमाणावर संख्याबळ उपस्थित होते पोलिस अधिक्षक श्रीकृष्णकाटे, अप्पर पोलिस अधिकारी अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी जमावावर नियंत्रण मिळवले आहे.
दोन्ही गटातील समाज बांधव एकत्र येऊन २५नोव्हेबर नंतर हा वाद मिटवण्यासाठी एकत्र येऊन समाज बांधव वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रसार माध्यमांला माहिती केले आहे.

Previous articleतुमसर येथील शारदा विद्यालयाने मतदारांना दिला 100 टक्के मतदान करण्याचा संदेश
Next articleवसमत विधानसभेसाठी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here