
आशाताई बच्छाव
सौ.निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते माहोरा येथे रेणुका माता मंदिरात आरती संपन्न.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद मुरलीधर डहाके.
दिनांक 07/10/2024
माहोरा येथील रेणुका माता मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली आहे. मंदिरामध्ये घटस्थापनेपासून दररोज सकाळ संध्याकाळ आरती घेण्यात येते. दिनांक 5 रवीवार रोजी चौथ्या माळ्याच्या निमित्ताने संध्याकाळच्या आरतीसाठी सौ. निर्मलाताई रावसाहेब दानवे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते आरती घेण्यात आली. त्यावेळी आरतीसाठी महिलांनी सभामंडप भरगच्च गर्दी केली होती त्यांनी रेणुका मातेची खणा नारळने ओटी भरली होती. त्यांच्या समवेत माहोरा येथील सरपंच श्री गजानन पाटील लहाने व सौ. सविता गजानन लहाने हे दोघेही त्यांच्या सोबत होते. तसेच पत्रकार व गावातील नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने आरती साठी उपस्थित होते.