Home उतर महाराष्ट्र धार्मिकता नितांत सुंदर गोष्ट- आमदार लहुजी कानडे

धार्मिकता नितांत सुंदर गोष्ट- आमदार लहुजी कानडे

41
0

आशाताई बच्छाव

1000819103.jpg

.धार्मिकता नितांत सुंदर गोष्ट- आमदार लहुजी कानडे      श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद , लोयोला दिव्यवाणी व ऑल पास्टर फेलोशिप, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ख्रिश्चन धर्मगुरूंचा त्यांच्या सामाजिक योगदानासाठी,हृदय सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्ष माननीय आमदार लहुजी कानडे साहेब होते, प्रमुख पाहुणे माजी उपनगराध्यक्ष अंजुमभाई शेख हे होते. सुरुवातीला, निशिकांत पंडित व प्रतिमा पंडित यांनी धार्मिक गीत गायले,पास्टर सतीश अल्हाट यांनी प्रार्थना केली.अध्यक्षीय सूचना परिषदेचे जिल्हासंघटक अजितकुमार सुडगे यांनी मांडली त्यास अनुमोदन विलासभाऊ पठारे यांनी दिले.प्रास्ताविक परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले.परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी अध्यक्षांची ओळख करून दिली; तसेच आमदार साहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा थोडक्यात व्यक्त केला. अध्यक्षपदाची सूचना जिल्हासंघटक अजितकुमार सुडके यांनी केली .त्यास अनुमोदन विलासभाऊ पठारे यांनी दिले.आमदार लहुजी कानडे आणि प्रमुख पाहुणे अंजुमभाई शेख यांच्या हस्ते सर्व धर्मगुरूंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथमतः जेष्ठ १० धर्मगुरूंना समाजभूषण पुरस्कार व ६0 धर्मगुरूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी परिषदेचे कार्यकर्ते, श्रीरामपूर तालुक्यातील धर्मगुरू धर्मभगिनी व समाजबांधव उपस्थित होते. लोयोला दिव्यवाणीचे व्यवस्थापक फा.अनिल चक्रनारायण यांनी धर्म सर्वसमावेशक असावा असे प्रतिपादन केले.आमदारांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.आपल्या भाषणात ते म्हणाले; राजकारण हे प्रत्येक नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.देशाच्या कारभाऱ्यांनी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले .व त्याद्वारे स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजाने कशी वाटचाल करावी यासाठी संविधानिक राष्ट्रवादही दिला. संविधानिक राष्ट्रवाद म्हणजे; भारतीय राज्यघटनेने भारतीयांना बहाल केलेले स्वातंत्र्य, समता,बंधुभाव, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकशाही जीवन पद्धती होय! प्राचीन काळापासून धर्माचे स्थान सर्वतोपरी श्रेष्ठ राहिलेले आहे. भारतामध्ये हजारो वर्षांपासून सर्व धर्म व पंथ गुण्या गोविंदाने नांदत आहेत;परंतु काही स्वार्थी लोकांनी सत्ता प्राप्त करण्यासाठी अलीकडच्या काळात धर्माला राजकारणात आणलेले आहे. ही फार खेदाची गोष्ट आहे. वास्तविकता धार्मिकता ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. परंतु धर्मांधतेचा काहींनी मार्ग पकडून धर्मा-धर्मामध्ये जाती-जातीमध्ये भेदभाव निर्माण करण्याचे पाप केले आहे. भारतीय समाजामध्ये फार प्राचीन काळापासून अस्पृश्यता होती.त्यायोगे अन्याय अत्याचार होता;परंतु स्वातंत्र्य चळवळीतील सुज्ञ नेत्यांनी ,या सर्व अनिष्ट रूढी प्रथा बाजूला ठेवून सर्वांना आनंदाने आपापला विकास करून घेता येईल ,अशा प्रकारचा सर्वोच्च कायदा भारतीय राज्यघटना म्हणून स्वीकारला आणि देशाच्या प्रगतीला वेग आला .या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान ,उद्योग- व्यवसाय, शेती, महिला कल्याण या सर्वांमध्येच संविधानिक विचार मूल्याने काँग्रेसच्या राजवटीत अमुलाग्र क्रांती झाली. अर्थात शिक्षण,आरोग्य यामध्ये मिशनऱ्याचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. गोरगरिबांची, सर्वसमावेशक ही विचारधारा पारंपारिक, मध्ययुगीन विचार असणाऱ्या लोकांना विशेषता मनूवाद्यांना पसंत पडली नाही. आणि त्यांनी पुन्हा एकदा विकासचक्र उलटे फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच धर्मप्रसाराबरोबरच, समाजप्रबोधन आवश्यक झालेले आहे. समाज प्रबोधनातूनच या देशातील शोषित,पीडित गरीब शेतकरी, अल्पसंख्यांक, आदिवासी,दलित या सर्व कष्टकऱ्यांना आपला जीवन मार्ग प्राप्त होणार आहे. शेवटी आमदार लहू कानडे यांनी पुरस्कार प्राप्त धर्मगुरूंचे अभिनंदन केले. अंजूमभाई शेख यांनी या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली, त्याबरोबरच त्यांनी ख्रिश्चन धर्मियांच्या आध्यात्मिक केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तर आमदार लहु कानडे यांनी त्या जागेवर सभागृह बांधून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आदिवासी समाजाचे नेते शिवाजीराव गांगुर्डे यांनी; मूळचा आदिवासी असलेला समाज सर्व धर्मातील उच्च मूल्य स्वीकारतो, म्हणून तेही आपले सोबतीच आहेत; असे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाची सांगता प्रीती भोजनाने झाली.या कार्यक्रमास माजी नगरसेवक अशोक कानडे, उंबरगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक भोसले, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब रेवाळे, दत्तनगरचे रवी अण्णा गायकवाड, आदिवासी एकलव्य संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय शिवाजीराव गांगुर्डे,चांगदेवभाऊ देवराय आणि लोयोला दिव्यवाणीचे व्यवस्थापक फादर अनिल चक्रनारायण, ऑल पास्टर फेलोशिपचे अध्यक्ष पास्टर राजेश कर्डक ,उपाध्यक्ष पास्टर विजय खाजेकर, सेक्रेटरी पास्टर अलिशा अमोलिक, उपसेक्रेटरी पास्टर प्रवीण गायकवाड, खजिनदार पास्टर शैलेश अमोलिक, उपखजिनदार पास्टर दीपक शेळके,पास्टर अण्णासाहेब अमोलिक, पास्टर सतीश आल्हाट, पास्टर सुभाष खरात, पास्टर याकोब वडागळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमासाठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष दिवे, सुनील बोरगे, नितीन जाधव, संतोष गायकवाड, सुनील संसारे, सुंदर संसारे, संदीप हिवाळे त्यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी राजू साळवे जेम्स पंडित, अजय लोंढे, पास्टर विजय सरोदे प्रमोद शिंदे,संजय साळवे हे देखील उपस्थित होते. शेवटी चंद्रकांत त्रिभुवन यांनी आभार मानले.

Previous articleधार्मिकता नितांत सुंदर गोष्ट- आमदार लहुजी कानडे
Next articleसलग ९ वेळा शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मिलेनियम नॅशनल स्कूलने रचला इतिहास!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here